Citytimestv Marathi
Marathi

राष्ट्रवादीला धक्का! मंत्री नवाब मलिक यांच्या जावयांना अटक

0 82


म. टा. प्रतिनिधी, मुंबई: अमली पदार्थ विक्री व दलालीमध्ये नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) बुधवारी समीर खान यांना अटक करण्यात आली आहे. समीर खान हे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई आहेत.

एनसीबीने शनिवारी करण सजनानी या ब्रिटीश अनिवासी भारतीयासह राहिला व शाईस्ता फर्निचरवाला, या दलाल बहिणींना अटक केली होती. या तिघांकडेही गांजासह अन्य अमली पदार्थ सापडले होते. त्याखेरीज करण सजनानी हा अमेरिका व लंडनहून अमली पदार्थांच्या तस्करीतदेखील सहभागी असल्याचे तपासात समोर आले. या तिघांच्या चौकशीतूनच ‘मुच्छड पानवाला’चे सह मालक रामकुमार तिवारी यांना मंगळवारी अटक करण्यात आली.

वाचा: कोण आहे ‘मुच्छड पानवाला’? ड्रग्ज प्रकरणात हे नाव कसं आलं?

यासंबंधी अधिक तपास केल्यानंतर समीर खान यांचे नाव समोर आले आहे.‘सजनानीसह अन्य तिघांच्या चौकशीत समीर खान यांचे नाव समोर आले. यामुळे आम्ही बुधवारी समीर खान यांना चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे’, असे एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.

वाचाः ही त्यांची कौटुंबिक बाब; धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रियाSource link

× आमच्याशी संवाद करा