सिटी टाइम्स । मराठी

अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

सिटी टाइम्स ऑनलाइन | उन्हाळ्यात रब्बी पिके घेतली जातात. यावर्षी सुद्धा विदर्भातील शेतकऱ्याने धानाचे उत्पादन घेतले. परंतु अवकाळी आलेल्या पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला आहे. कोरोनाकाळात आधीच टाळेबंदीमुळे रोजगार नाही व त्यात आणखी दुःखाची भर यांमुळे सामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांना नुकसान झाले ते झालेच परंतु धानपिकाचेही नुकसान झाले. सरकारने याची दखल घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दयावी अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी , भंडारा तर्फे देण्यात आले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, नुकसानभरपाई तात्काळ जाहीर करा वंचितची मागणी

लाखनी तहसिलदारांनी नुकसानग्रस्तांची व्यथा शासनदरबारी मांडण्याचे आश्वासन दिले आहे तसेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून भरपाई देण्यात येईल अशी माहीती दिली आहे.